बुधवार, ४ नोव्हेंबर, २०१५

सातत्यपुर्ण सर्वंकष मुल्यमापन

cce वरील लेख आहे
काळजी पूर्वक वाचन करा
विषय - सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्घती उपयुक्तता
१) आकारीक मूल्यमापन म्हणजे काय?
आकारिक मूल्यमापन म्हणजे
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू असताना विद्यार्थ्याचे सातत्याने केले जाणारे मूल्यमापन.
विद्याथ्याचं व्यक्तीमत्व आकार घेत असतांना केललं मुल्यमापन म्हणजेच आकारिक मुल्यमापन
अध्ययनाचा प्रत्येक टप्पा गाठण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन होय.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौध्दिक सामाजिक विकासाची चाचणी.. म्हणजे मूल्यमापन
२) अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूल्यमापन साधनतंञाची उपयुक्तता किती व कशी?
आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation) –
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आकार घेत असतांना नियमित करण्याचे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन होय. या मूल्यमापनात पुढील साधनतंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर प्रत्येक विद्यार्थ्याच्या नोंदी ठेवणे अपेक्षित आहे.
दैनंदिन निरीक्षण
तोंडी काम (प्रश्नोत्तरे, प्रकटवाचन, भाषण संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादी)
प्रात्यक्षिक / प्रयोग
उपक्रम / कृती (वैयक्तिक, गटांत, स्वयंअध्ययनाद्वारे)
प्रकल्प
चाचणी – (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारीक स्वरुपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह चाचणी (Open book test))
स्वाध्याय / वर्गकार्य
इतर – (प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साधने.)
वरील साधन तंत्रापैकी इयत्ता, विषय व उद्दिष्टे विचारात घेवून अधिकाधिक साधन तंत्राचा वापर करावा.
मूल्यमापन करतांना किमान पाच साधनतंत्राचा वापर करावा, तर कला व संगीत, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी दैनंदिन निरीक्षण, प्रात्यक्षिक व उपक्रम/कृती या तीन साधनतंत्राचा वापर करावा. तसेच विद्यार्थ्यांना वर्षभरात किमान एक प्रकल्प व प्रत्येक सत्रात किमान एक छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकांसह लेखी चाचणी (Open book test) घेणे अपेक्षित आहे.
विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व आकार घेत आसतांना विहीत केलेल्या सर्व क्षमतांचे निकष पुर्ण होत आहेत हे सतत पाहणे व त्यासाठी तंञांचा वापर करणे
सुप्तगुणांचा शोध घेता येतो.
अध्ययन-अध्यापनातील त्रुटी दूर करण्याची दिशा निश्चित करता येते.
आपले विचार व मत कसे व्यक्त करतो हे टिपता येते.
प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येते.
३) तोंडीकाम साधनतंञाची उपयुक्तता किती वाटते? त्याचा योग्य वापर कसा करावा?
वेदापासूनची आपली अभ्यासशैली
मुखोद्गत तंत्रावर अधिक भर देणारी
आपण तोंडी काम मध्ये पाठांतर घेऊ शकतो .. कविता गायन , भाषण, वाचन घेऊ शकतो
निडलेल्या सर्व तंत्राचे नियोजन तयार आसावे व विशेष करून तोंडी तंञाचा प्रथम करावा.. लेखनात कमजोर असणारे विद्यार्थीस तोंडी काम उपयुक्त आहे.. सभाधीटपणा तोंडीकामातून च दिसतो
अनेक घटक असतात..नेहमीच
आपण तोंडीकाम घेतो..पण आकारिक मूल्यमापन करताना
एकच घटक घेऊन त्यावरच तोंडी
काम घ्यावे व गुणदान करावे
योग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणी असेल तरच... तोंडीकाम यशस्वी
तोंडीकाम हे साधनतन्त्र निवडले असता याद्वारे विद्यार्थ्याच्या अभिव्यक्तिला संधी मिळते,सभाधीटपणा वाढतो.आत्मविश्वास वाढतो,मनातील भिती न्यूनगंड दूर होतो,शिक्षकाशी अधिक जवळचे नाते निर्माण होउन शाळेविषयी शिक्षकप्रती आकर्षण निर्माण होते.....
तोंडीकाम सत्राच्या आठवड्यातच करावे तशी टाचणात नोंद करावी
निकष नजरे समोर ठेवा.
व गुणदान करा
यासाठी आपल्याला तोंडीकामात आपण कृतियुक्त कविता गायन घेउ शकतो,प्रश्नोत्तरे,अध्ययन अध्यापनावेळी प्रसंगानुरूप संवाद घेता येइल,गटचर्चा,विविध कृति या व इतर बाबी नियोजनानुसार घेउ शकतो
CCE=
Continuous
comprehensive
Evaluation
हे नावाप्रमाणेच वेळोवेळी व्हावे
नाहीतर प्रामाणिक मूल्यमापनात
अडचणी येतील
मुलांचे उच्चारदोष दूर करायला हवेत
४ ) दैनंदिन निरीक्षण साधनतंञाची उपयुक्तता किती? वापर कसा केला जावा?
दैनं. निरी. म्हणजे
मुलांच्या वर्तनाची
total profile असते
निरी. नोंद निगेटीव्ह नसावी.. विशेष गुणनोंद करावी
दैनंदिन निरीक्षण मधुनच आपल्याला विद्यार्थ्याच्या वर्तनाची माहिती होते
विद्यार्थी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी दैनंदिन निरीक्षण महत्वाचे
वर्तनबदल होतो का ते समजले जाते
कल व आवड समजते
निरीक्षण मध्ये सर्जनात्मक बाबींची नोंद महत्वपूर्ण
शिकण्याची गती व पद्धतीचा मागोवा घेता येतो.
कच्च्या नोंदी ठेवून त्यातील चांगल्या नोंदी निवडाव्यात
Negative नोंद वेगळ्या कागदावर घ्यावी
Feedback करीता मदत होईल
बालकाची कमजोरी
शिक्षकांच्या लक्षात राहिल
नुसत्या नोंदी करायची नाही तर कमकुवत बाबीत मार्गदर्शन करायचे आहे
हेतुपुरस्सर उदिष्ट निश्चित करुन निरिक्षण व वस्तुनिष्ठ नोंदी हव्यात समस्या व उपायांचे चिंतन व पाल

ज्ञानरचनावाद व उपक्रम

ज्ञानरचनावाद म्हणजे काय ???
१)भराडेमॅडम= यांनी pptच्या सहाय्याने मेंदु शिकण्याचा अवयव आहे.शरीराच्या २% वजन असणार्‍या मेंदुस २०% प्राणवायु लागतो.मेंदु वाढ गर्भात ७०%,पहिल्या वर्षी १५%,तीन वर्षात १०%,बारा वर्षात ५%होते.जन्मतः१००अब्ज मज्जापेशी मेंदुत असतात.शिकणे नैसर्गिक आहे.सुखद अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दुःखद अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात.मुलास तु चांगला आहेस गोड आहेस असे प्रबलन देत रहाणे मेंदुविकासास महत्वाचे आहे.आपण वर्तनवादी पध्दतीचे गुलाम आहोत.गणित सोडवण्याच्या पध्दती सांगु नये मुलांनी शोधायला हवे.मुलांस भीती वाटते तेव्हा न्युरोकार्टिक्सकडुन भावनिककडे प्राणवायु पुरवठा होतो खंडित पुरवठा सतत होणारी मुले उपद्रवी बनतात.मुलांस आनंददायी वातावरणात शिक्षण चांगले होते.
इंग्रजी भाषा
instruction 400अर्थासह संग्रहित केल्या.रोज १०सुचना देणे.Genral question 150 संकलित केले परिपाठावेळी 5प्रश्न विचारणे.तसेच Myselfप्रमाणेMy friend My School My Teacher घेणे.स्वयंअध्ययनकार्ड flashcard रोज 5 घेणे.dictionary मधुन शब्द शोधण्याचा खेळ घेणे.नेटवरुन भरपुर rhymes घेणे.word puzzelsवone word one sentence one question असा शब्दावरुन वाक्य सांगणे प्रश्न तयार करणे.अशा गोष्टी सातत्याने घेणे.
वर्गतयारी मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले खेळण्यात रमतात.सोपी बडबडगीते घेतो.
उपक्रम=१)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे चित्रवर्णन करणे.२)चित्रगप्पा मारणे३)आठवड्यातुन एकदा ठरवुन गप्पा मारणे.४) न ठरवता गप्पा मारणे.५)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर फक्त चित्रवाचन व नंतर फक्त शब्दवाचन = पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.६)चित्राशी शब्द जोड्या लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच हवा.
हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते त्यातील भाज्या शालेय पोषण आहार टाकल्या जातात.
मराठी विषय. शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात.
उपक्रम=१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे.३)समान अक्षर जोड्या लावणे.४)अक्षर आगगाडी बनवणे.५)पाहुणा अक्षर ओळखणे.६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.७)बाराखडीवाचन करणे.८)बाराखडीतक्तेवाचन करणे.९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.११)कथालेखन करणे.१२)कवितालेखन करणे.१३)चिठठीलेखन करणे.१४)संवादलेखन करणे.१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
गणित १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे२)वर्गातील वस्तु मोजणे३)अवयव मोजणे४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.६)आगगाडी तयार करणे७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.९)अंकाची गोष्ट सांगणे.१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.१३)बेरीजगाडी तयार करणे.१४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.

गणित महत्वाची सुत्रे

Sunil Pawar > ‎शिक्षक मित्र
गणित : महत्त्वाची सूत्रे
मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी
संख्या,
सम संख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,
विषम संख्या - २ ने भाग न जाणारी संख्या,
जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो,
संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.
संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम
A)समसंख्या + समसंख्या= समसंख्या.
B)समसंख्या - समसंख्या= समसंख्या.
C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.
D)विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या
E)समसंख्या × समसंख्या = समसंख्या.
F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.
G)विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या.
एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी
९०,तीन अंकी ९०० आणि चार अंकी
एकूण संख्या ९००० आहेत.
० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
।।) १ हा अंक २१ वेळा येतो.
।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.
१ ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूणसंख्या प्रत्येकी
१९ येतात.
।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्याप्रत्येकी
१८ संख्या असतात.
दोन अंकांमधून एकूण २ संख्या,तीन अंकांमधून एकूण ६
संख्या,चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या
तयार होतात.
विभाज्यतेच्या कसोटय़ा
A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या -संख्येच्या
एककस्थानी ०, २, ४, ६, ८
यापैकीकोणताही अंक असल्यास.
B)३ ची कसोटी-संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३
ने नि:शेषभाग जात असल्यास.
C)४ ची कसोटी-संख्येच्या शेवटच्या २
अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ४ ने नि:शेष भाग जात
असल्यासअथवा संख्येच्या शेवटी
कमीतकमी दोन शून्यअसल्यास.
D)५ ची कसोटी-संख्येच्या एकक स्थानचा अंक जर
० किंवा ५असल्यास.
E)६ ची कसोटी-ज्या संख्येला २ व ३ या
अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोचकिंवा
ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित
भाग जातो.
F)७ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या ३
अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून
डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार
झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग
गेल्यास त्यासंख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.
G)८ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या
तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेषभाग
जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी
कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने
निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा
अंकअसतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो
त्या संख्येला ८ ने भाग जातो.
H)९ ची कसोटी-संख्येतील सर्व
अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.
I)११ ची कसोटी-ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया
समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा
११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक
सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ०
किंवा ११ च्या पटीत असतो.
J)१२ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ४या
अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.
K)१५ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ५
अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.
L)३६ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग
जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.
M)७२ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ८ ने निशेषभाग
जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.
लसावि - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या:
दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहानसंख्येला पूर्ण भाग जातो
ती संख्या
मसावि - महत्तम सामाईक विभाजक संख्या:
दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने(विभाजकाने) भाग जातो
ती संख्या
प्रमाण भागिदारी
A)नफ्यांचे गुणोत्तर= भांडवलांचे गुणोत्तर ×मुदतीचे गुणोत्तर,
B)भांडवलांचे गुणोत्तर= नफ्यांचे गुणोत्तर+मुदतीचे गुणोत्तर,
C)मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर ÷ भांडवलाचे गुणोत्तर.
गाडीचा वेग-वेळ-अंतर
A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ
=गाडीची लांबी ÷ ताशी वेग ×
१८/५
B) पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ
=गाडीची लांबी + पुलाची
लांबी ÷ताशी वेग × १८/५
C) गाडीचा ताशी वेग=कापावयाचे एकूण अंतर ÷
लागणारा वेळ ×१८/५
D) गाडीची लांबी=ताशी वेग ×
खांब ओलांडताना लागणारावेळ × ५/१८
E) गाडीची लांबी + पुलाची
लांबी = ताशी वेग× पूल ओलांडताना लागणारा वेळ +
५/१८
F) गाडीचा ताशी वेग व लागणारा वेळ काढताना १८/५ ने
गुणा व अंतर काढताना ५/१८ ने गुणा
G) पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग=नावेचा प्रवाहाच्या दिशेने
ताशी वेग - प्रवाहाच्याविरुद्ध दिशेने ताशी वेग ÷ २
सरासरी
A) X संख्यांची सरासरी= दिलेल्या
संख्येची बेरीजभागिले X
B) क्रमश:संख्याची सरासरी ही
मधली संख्या असते.
C) X संख्यामान दिल्यावर ठराविकसंख्यांची सरासरी =
(पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ X
D) X या क्रमश: संख्याची बेरीज =
(पहिली संख्या + शेवट

नोंदी कशा कराव्या

Sunil Pawar > ‎शिक्षक मित्र
CCE
------------------------------------------
===============
नोंदी कशा कराव्यात..!
♻व्यक्तिमत्व गुणविशेष ♻
1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
2 आपली मते ठामपणे मांडतो
3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो
4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
5 आत्मविश्वासाने काम करतो
6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
11 धाडसी वृत्ती दिसून येते
12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
18 शाळेच्या नियमाचे पालन करतो
19 इतराशी नम्रपणे वागतो
20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
21 नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात
22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
23 शाळेत येण्यात आनंद वाटतो
24 गृहपाठ आवडीने करतो
25 खूप प्रश्न विचारतो
26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो
27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो
♻सुधारणा आवश्यक ♻
1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
2 अभ्यासात सातत्य असावे
3 अवांतर वाचन करावे
4 शब्दांचे पाठांतर करावे
5 शब्दसंग्रह करावा
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
7 नियमित शुद्धलेखन लिहावे
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
9 खेळात सहभागी व्हावे
10 संवाद कौशल्य वाढवावे
11 परिपाठात सहभाग घ्यावा
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
16 चित्रकलेचा छंद जोपासावा
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18 संगणकाचा वापर करावा
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे
21 गटकार्यात सहभाग वाढवावे
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
31 शालेय परिपाठात सहभाग असावा
32 उपक्रमामध्ये सहभाग असावा
33 लेखनातील चुका टाळाव्या
34 नकाशा वाचनाचा सराव करावा
35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
36 नियमित अभ्यासाची सवय लावावी
37 नियमित उपस्थित राहावे
38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
39 वाचन व लेखनात सुधारणा करावी
40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
42 अक्षर सुधारणे आवश्यक
43 भाषा विषयात प्रगती करावी
44 अक्षर वळणदार काढावे
45 गणित सूत्राचे पाठांतर करावे
46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
48 गणिती क्रियाचा सराव करा
49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
50 गणितातील मांडणी योग्य करावे
51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे
♻आवड /छंद♻
1 चित्रे काढतो
2 गोष्ट सांगतो
3 गाणी -कविता म्हणतो
4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
5 खेळात सहभागी होतो
6 अवांतर वाचन करणे
7 गणिती आकडेमोड करतो
8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो
9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
10 कथा,कविता,संवाद लेखन करतो
11 वाचन करणे
12 लेखन करणे
13 खेळणे
14 पोहणे
15 सायकल खेळणे
16 चित्रे काढणे
17 गीत गायन
18 संग्रह करणे
19 उपक्रम तयार करणे
20 प्रतिकृती बनवणे
21 प्रयोग करणे
22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
23 खो खो खेळणे
24 क्रिकेट खेळणे
25 संगणक हाताळणे
26 गोष्टी ऐकणे
27 गोष्टी वाचणे
28 वाचन करणे
29 रांगोळीकाढणे
30 प्रवास करणे
31 नक्षिकाम
32 व्यायाम करणे
33 संगणक
34 नृत्य
35 संगीत ऐकणे
♻मराठी ♻
" 1" आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
" 2" ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
" 3" बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
" 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
" 5" प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
" 6" मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
" 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो
" 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
" 9" लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
" 10" योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
" 11" विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
" 12" स्वत:हून प्रश्न विचारतो
" 13" कविता तालासुरात साभिनय म्हणतो
" 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
" 15" नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
" 16" दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
"

Power point presentation

💻संगणकावर PPT कशी बनवाल ?💻
             
1) प्र थम MS Office ओपन करुन power point ओपन  करा
2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा
3)स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका
4) बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा
5)आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल
6)फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा
7) आता आपण साऊंड देऊ
आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे  option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा
अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता
8) आता आपण अॅनिमेशन देऊ
यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता  उजव्या बाजुला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट  करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला  अॅनिमेशन द्या अशा
  प्रकारे अनेक स्लाईड तयार करा
      यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ
वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा  (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे  ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल
स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल
सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता
अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता🙏🙏🙏 तंत्रस्नेही बना🙏🙏