सोमवार, १४ मार्च, २०१६

बाराखडी शब्दसंग्रह

बाराखडीप्रमाणे शब्दमराठी-व्याकरण
*.अ - अंजीर, अग्नि, आरसा, आठ, आगगाडी, इमारत, ईडलिंबू, उशी, ऊन, ऊर्जा, एक, ऎट, ओम,ओठ,ओळ,ओळख, औत, अंडे, अंधार,
*.क - कमळ, कागद, कुर्हाड, कूजन, केर, केरसुणी, केवडा, कैरी, कोपरा, कौल, कंठ,
*.ख- खजूर, खारीक,, खुजा, खूर, खीर, खुरपे, खेडे, खोरे, खंडणी
*.ग- गणपती, गवत, गाय, गुलाल, गूळ, गेला,गैर, गोधन, गोठा, गौरी, गंध
*.घ - घर, घार,घाट, घुबड, घूस, घेवदा, घोटा
*.च- चमचा, चकली, चार, चुका, चूक, चिमटा, चिमणी, चैन, चौक, चंद्र
*.छ - छत्री, छान, छू मंतर, छे, छोटा,छिन्नी,छंद
*.ज- जहाज, जंगल, जागा, जुन्नर,जुने, जून, जे, जेवण, जोर, जंजीर
*.झ- झगा, झबले, झारा, झिरपणे, झुणका, झुडुप, झोका, झंकार
*.ट- टरबूज, टाक, टाकणे, टिकाव, टीव्ही, टुकार, टेकडी, टोमॅटो, टंगस्टन
*.ठ- ठसा, ठार, ठिकान, ठीक, ठेच, ठॆंगणी ठुसकी, ठो,
*.ड- डबा, डाव, डबी, डिंक,डुक्कर, डेरा, डोके, डंख
*.ण- बाण, बाणा, आणि, अणु, करमणूक, नाणे,
*.त- तवा, तबक, तार, ताट,तिसरा, तीट, तुटणे, तूट, तूर, ते, तेल, तोबरा, तैलरंग, तंतुवाद्य
*.थ- थवा, थाट, थिटे, थुंकणे, थेर, थोर,
*.द- दरवाजा, दार, दुसरा, दूर, दिवस, दीक्षा, देव, दैव, दोन, दौत, दंतकथा
*.ध- धनुष्य, धार, धिक्कार, धीट, धुसर, धुणे, धूर, धेनु, धैर्य, धोका,धंदा
*.न - नळ, नाटक, निराळा, नीट, नुकसान, नूरजहान, नेम, नैवेद्य, नंदादीप
*.प- पतंग, पाट, पिवला, पीस, पुस्तक, पूर, पेरणी, पैलतीर, पोहे, पौष, पंडीत
*.फ- फनस, फार, फिरणे, फी, फीट, फेटा, फैलावर, फोन, फौंटनपेन, फंड
*.ब- बदक, बाक, बिबट्या, बुलबुल, बूट, बेरीज, बैरागी, बोर, बंद
*.भ- भटजी, भाजी, भिजणे, भीम, भुरका, भूमी, भेकड, भैरवी, भोपळा, भौतिक, भंपक
*.म- मगर, मका, मासा, मिसळ, मी, मुद्दल, मुलगा, मूळ, मेवा, मैना, मोर,मौन, मंत्र
*.य- यज्ञ, यकृत, यान, वायु, योग, यौवन, यंत्र
*.र- रवी, राग, रिमोट, रूप, रीघ, रेघ, रेष, रोपटे, रौद्र, रंग
*.ल- लसूण, लहान, लाज, लिहिणे, लीला, लुटुपुटी,लूट, लेझीम, लोकर, लौकीक, लंका
*.व- वजन, वारा, विमान, वीज, वुलन, वेचणे, वैरी, वोट,वंदन
*.श - शहामृग, शाळा, शिवाजी, शील, शुभ, शूर, शेला, शैली, शोक, शौर्य, शंका
*.ष - षटकार, औषध, विशेष
*.स- ससा, साप, सात, सीट, सुमन, सूज, असे, सैरंध्री सौभाग्य, संधी
*.ह- हत्ती, हात, हिरवा, काही, हुलकावणी, काहूर, हेर, हैदराबाद, होय, हौस, हं स
*.ळ - बाळ, वाळा, कळी, अळु, फळे,
*.क्ष - क्षत्रिय, क्षार, नीरक्षीर, क्षुधा, क्षेम, अक्षौण,
*.ज्ञ - यज्ञ, ज्ञानेश्वर, आज्ञा, ज्ञानदीप, राज्ञी,
*.श्र - श्रम, श्रावक, श्री, अश्रू, श्रेय, आश्रित
,*.त्र - सत्र, त्राटिका, त्रिकोण, त्रैराशिक,

रविवार, १३ मार्च, २०१६

ज्ञानरचनावाद पूरक प्रश्न

लहान मुलांना नेहमी असे प्रश्न विचारत रहा..चालना मिळेल       ✍ज्ञानरचनावाद✍

इयत्ता पहिली ते आठवी साठी उपयोगी पडतील अशी १००  प्रश्न देत आहे.
यात सर्व विषयांची प्रश्न समाविस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे .
यात प्रश्नांची काठीण्य पातळी वाढवत नेली आहे.
पहिली साठी सोपे प्रश्न आहेत.

०१.) तुमचे पूर्ण नाव सांगा.
०२.) तुमच्या आईचे नाव सांगा.
०३.) तुम्हाला किती भाऊ आहेत ?
०४.) तुम्हाला किती बहिणी आहेत ?
०५.) तुमच्या भावाचे नाव सांगा.
०६. तुमच्या बहिणीचे नाव सांगा.
०७.) मामा कोणाला म्हणतात ?
०८.) तुमच्या मामाचे नाव सांगा.
०९.) मामी कोणाला म्हणतात ?
१०.) तुमच्या मामीचे नाव सांगा.
११.) मावशी कोणाला म्हणतात ?
१२.) तुमच्या मावशीचे नाव सांगा.
१३.) आजी कोणाला म्हणतात ?
१४.) तुमच्या आजीचे नाव सांगा.
१५.) आजोबा कोणाला म्हणतात ?
१६.) तुमच्या आजोबाचे नाव सांगा.
१७.) तुमच्या काकाचे नाव सांगा.
१८.) तुमच्या काकीचे नाव सांगा.
१९.) तुमच्या शाळेचे नाव सांगा.
२०.) तुमच्या वर्ग शिक्षकांचे नाव सांगा.
२१.) तुमच्या मुख्या ध्यापकाचे नाव सांगा.
२२.) तुमच्या आवडत्या शिक्षकांचे / madam चे नाव सांगा.
२३.) तुमच्या घरात एकूण किती माणसे आहेत ?
२४.) तुमच्या घरात एकूण किती पुरुष आहेत ?
२५.) तुमच्या घरात एकूण किती स्त्रिया आहेत ?
२६.) तुमच्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत ?
२७.) तुमच्या वर्गात एकूण किती मुले आहेत ?
२८.) तुमच्या वर्गात एकूण किती मुली आहेत ?
२९.) तुमच्या शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत ?
३०.) तुमच्या आवडत्या मित्राचे नाव सांगा.
३१.) तुमचा आवडता प्राणी कोणता ? का ?
३२.) तुमचा आवडता पक्षी कोणता ? का ?
३३.) तुमचा आवडता रंग कोणता ? का ?
३४.) तुमचे आवडते झाड कोणते ? का ?
३५.) दुध कोण देते ?
३६.) अंडी कोण देते ?
३७.) मासे कोठे राहतात ?
३८.) मासे काय खातात ?
३९.) पाण्यात राहणारे प्राणी कोणते ?
४०.) आपल्या गावाचे नाव सांगा.
४१.) आपल्या तालुक्याचे नाव सांगा.
४२.) आपल्या जिल्ह्याचे नाव सांगा.
४३.) आपल्या राज्याचे नाव सांगा.
४४.) आपल्या देशाचे नाव सांगा.
४५.) आपल्या देशाची राजधानी कोणती ?
४६.) आपल्या राज्याची राजधानी कोणती ?
४७.) आपल्या राज्याची उपराजधानी कोणती ?
४८.) आपल्या देशात किती राज्य आहेत ?
४९.) आपल्या राज्यात किती जिल्हे आहेत ?
५०.) आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
५१.) आपल्या तालुक्या शेजारील तालुके सांगा.
५२.) आपल्या जिल्ह्या शेजारील जिल्हे सांगा.
५३.) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?
५४.) आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?
५५.) आपले राष्ट्रीय फुल कोणते ?
५६.) आपले राष्ट्रीय फळ कोणते ?
५७.) आपला राज्य प्राणी कोणता ?
५८.) आपला राज्य पक्षी कोणता ?
५९.) आपला राज्य वृक्ष कोणता ?
६०.) आपले राज्य फुल कोणते ?
६१.) आपली राज्य भाषा कोणती ?
६२.) आपली राष्ट्रीय भाषा कोणती ?
६३.) आपले राष्ट्रीय गीत कोणते ?
६४.) आपले रास्त्र ध्वज चे नाव काय ?
६५.) आपला स्वतंत्र दिन केव्हा असतो ?
६६.) आपला प्रजासत्ताक दिन कधी असतो ?
६७.) महारास्त्र दिन कधी असतो ?
६८.) आपले राष्ट्र गीत कोणते ?
६९.) आपली राष्ट्रीय नदी कोणती ?
७०.) आपला राष्ट्रीय खेळ कोणता ?
७१.) एका दिवसात किती तास असतात ?
७२.) एका तासात किती मिनिट असतात ?
७३.) एका मिनिटात किती सेकंद असतात ?
७४.) एका आठवड्यात किती दिवस असतात ?
७५.) एका महिन्यात किती दिवस असतात ?
७६.) एका वर्षात किती महिने असतात ?
७७.) वर्षाचे इंग्रजी महिने सांगा.
७८.) वर्षाचे मराठी महिने सांगा .
७९.) आठवड्याचे वार सांगा.
८०.) वर्षाचे ऋतू किती आहेत ?
८१.) वर्षातील ऋतूंची नावे सांगा .
८२.) वर्षात एकूण किती आठवडे असतात ?
८३.) भारताच्या राष्ट्र ध्वजावर किती रंग आहेत ?
८४.) अशोक चक्रात किती आरे आहेत ?
८५.) वजन मोजण्याचे एकक कोणते ?
८६.) लांबी मोजण्याचे एकक कोणते ?
८७.) द्रव्य मोजण्याचे एकक कोणते ?
८८.) एक किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
८९.) एक लिटर म्हणजे किती मिली लिटर ?
९०.) एक किलो म्हणजे किती ग्रॅम ?
९१.) एक टन म्हणजे किती किलो ग्रॅम ?
९२.) एक डझन म्हणजे किती वस्तू ?
९३.) एक तोळा म्हणजे किती ग्रॅम ?
९४.) एक दस्ता म्हणजे किती पाने ?
९५.) एक रिम म्हणजे किती दस्ते ?
९६.) नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या शरीरात किती हाडे असतात ?
९७.) पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरात किती हाडे असतात ?
९८.) विमानासाठी कोणते इंधन वापरतात ?
९९.) सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता ?
१००.) माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी का आहे ?

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

नवोपक्रम

नवोपक्रम तयार करताना करावयाची पूर्व तयारी:-
●समस्ययादी तयार करने> ●त्यांचा प्राधान्य क्रम लावणे>●एक समस्या निवड>●ती समस्या निवडिची गरज/ कारणे>● शीर्षक>●उद्दिष्टे निर्मिती>●उपक्रमाचे नियोजन>●कार्यवाही>●यशस्विता/उपयुक्तता।

✨��नवोपक्रम अहवाल लेखनाचे मुद्दे✨��
�� शीर्षक
��गरज
��उद्दिष्टे
��नियोजन
��कार्यवाही
��निष्कर्ष(यशस्वित)
��समारोप
��संदर्भग्रंथ व परिशिष्टे

काही संकल्पना********
गरज: a. पार्श्वभूमी
          b. क्षेत्रनिश्चिती ( जेथे हा उपक्रम राबविणार आहोत.उदा.आपली शाळा
         c. उपक्रमाचे वेगलेपण
          d. उपयुक्तता

उद्दिष्टे: उपक्रम का करायचा? कोणासाठी? कसा? इत्यादिंचा विचार करून ठरवावा.

नियोजन: *विषयाशी संबंधित तज्ञांशी चर्चा
*कोणती साधने वापरायची? या संबंधी चर्चा
* करावयांच्या कृतिंची क्रम मांडणी
*कार्यवाहिचे टप्पे(वेळापत्रक)
*उपक्रमांचे फोटो,वर्तमानपत्रांत उपक्रमाचे आलेले फोटो येथे जोडावेत.

कार्यवाही(1500 ते 1800 शब्द):
  ° पुर्वस्थितिचे वर्णन या ठिकाणी लिहून काढने.
°कार्यवाहिच्या दरम्यान निरिक्षणे/अनुभवाच्या नोंदी व माहिती संकलन
° उपक्रम पूर्ण झाल्यावर निरिक्षणे व त्याच्या नोंदी
° कार्यवाहित आलेल्या अडचणी
°आवश्यक असल्यास माहितीचे विश्लेषण,आलेख व तख्ते यांचा अंतर्भाव करावा।

यशस्विता/ निष्कर्ष:-( 1000 ते 1300 शब्द/5पाने)
°उद्दिष्टानुसार उपक्रमाची कोणती उद्दिष्टे साध्य झाली याची माहिती।
(वर्णनात्मक किंवा आलेखात्मक माहिती)

संदर्भग्रंथे व परिशिष्टे :  यात वापरलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी,भाग घेणार्या विद्यार्थ्यांची माहिती,सन्दर्भलेख इत्यादींची माहिती जोडणे ।
(सूचना:केलेल्या नवोपक्रमाची नोंद ठेवणे आवश्यक आहे)



��नवोपक्रम गुणदान��

@ नवीनता (कल्पक ,कार्यवाही व पद्धती)- 20 गुण
@नियोजन (वेळापत्रक,साधने,पुरावे ,सादरीकरण)-25 गुण
@कार्यवाही - 25 गुण
@यशस्विता -15 गुण
@अहवाल लेखन - 10 गुण
@संदर्भ- 05 गुण
एकूण -100 गुण

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

गणितीय सुत्रे

हि पोस्ट आपल्या मुलांसाठी आहे...त्यांच्या अभ्यासा साठी आहे...शक्य असल्यास सेव्ह करून ठेवा..

🎯वर्तुळ -

त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. 

वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात. 

वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो. 

जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.

व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय. 

वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो. 

वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो. 

वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D 

अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7 

अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36 

वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)

वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22   

वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30 

अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2 

अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36 

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर. 

दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते. 

वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ -

घनफळ -

इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)

काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची 

गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)

गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2     

घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3

घनचितीची बाजू = ∛घनफळ

घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते. 

घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2 

वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h 

वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2 

वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h 

इतर भौमितिक सूत्रे -

समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची 

समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार 

सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2

वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2

वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr

घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2

दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh 

अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2

अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )

शंकूचे घनफळ = 1/3 πr3h  

समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2

दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h) 

अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2 

(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)  

वक्रपृष्ठ = πrl

शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी 

बहुभुजाकृती -

n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.

सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.

बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते. 

n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते. 

सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप 

बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2 

उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9

तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -

1 तास = 60 मिनिटे     

0.1 तास = 6 मिनिटे   

0.01 तास = 0.6 मिनिटे

1 तास = 3600 सेकंद     

0.01 तास = 36 सेकंद   

1 मिनिट = 60 सेकंद     

0.1 मिनिट = 6 सेकंद 

1 दिवस = 24 तास

              = 24 × 60

              =1440 मिनिटे  

              = 1440 × 60

              = 86400 सेकंद

घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -

घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते. 

दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो. 

दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.

तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात. 

 दशमान परिमाणे -

विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.

100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल 

10 क्विंटल = 1 टन  
   1 टन = 1000 कि.ग्रॅ. 

1000 घनसेंमी = 1 लिटर  

1 क्युसेक=1000घन लि.   

12 वस्तू = 1 डझन  
   12 डझन = 1 ग्रोस   
     24 कागद = 1 दस्ता 

20 दस्ते = 1 रीम   
 1 रीम = 480 कागद. 

विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -

अ) अंतर –

1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.

1 से.मी. = 0.394 इंच 

1 फुट = 30.5 सेमी.  

1 मी = 3.25 फुट

1 यार्ड = 0.194 मी.
           1 मी = 1.09 यार्ड

ब) क्षेत्रफळ -    

1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2

1 सेमी 2 = 0.155 इंच 2

1 एकर = 0.405 हेक्टर

1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे

1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2

1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल 

1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर 

क) शक्ती -    

1 एच.पी. = 0.746 किलो वॅट

1 किलो वॅट = 1.34 एच.पी. 

ड) घनफळ -    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2

1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3 

क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3

1 मी 3 = 35 फुट 3 

1 यार्ड 3 = 0.765 मी. 3 

इ) वजन -    

1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0

1 पौंड (lb) = 454 ग्रॅम

1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb) 

वय व संख्या -

दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2

लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2

वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो. 

दिनदर्शिका –

एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस 

महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात. 

टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात. 

नाणी -

एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज 

एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1 

पदावली -

पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)

💠💢💠💢💠💢

सोमवार, १८ जानेवारी, २०१६

परिपाठ

शालेय परिपाठासंबंधीत वॉट्सपवर आलेली सुंदर पोस्ट....

प्राथमिक शाळेतील इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी ५-६ विद्यार्थ्यांचे इयत्तेनुसार गट पाडावेत.त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे परिपाठातील विशिष्ट घटकांची जबाबदारी सोपवावी.

आठवड्यातील ६ वार वर्गवार विभागून द्यावेत.

उदा. सोमवार-८वी

मंगळवार-७वी असे...

आपणास परिपाठासाठी ३०मिनीटे वेळ असल्याने पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.

1⃣ सावधान- विश्राम आदेश

संचालन करणा-या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.

2⃣ राष्ट्रगीत

सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.शक्य झाल्यास साउंडद्वारे राष्ट्रगीत घ्यावे.

3⃣ प्रतिज्ञा

आठवड्यात ६ दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिस-या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी. किंवा सलग दोन दिवस एका भाषेतूनही सादर करता येईल.

(विद्यार्थ्यांचा स्तर पाहून बदल करता येईल.उदा-७वी-८वी-इंग्रजी, ५वी-६वी-हिंदी, ३री-४थी-मराठी)

4⃣ भारताचे संविधान

परिपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील. याही ठिकाणी शक्य असल्यास इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतून संविधान घेता येईल.

5⃣ प्रार्थना व श्लोक

ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे. प्रार्थना या विशिष्ट धर्माच्या असू नयेत, ज्यातून मानवता, दया, त्याग अशा गुणांची रुजवण होईल अशा असाव्यात.

6⃣ आजचा दिवस

केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतो, कोणता वार आणि कोणती तारीख आहे.

7⃣ सुविचार

सुविचार म्हणजे सुंदर असे विचार. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

8⃣ दिनविशेष

चला जाणून घेऊया, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले ते सांगत आहे-----.(विद्यार्थ्याचे नाव)

9⃣आजची म्हण व वाक्यप्रचार-

कमी शब्दांत जास्त अर्थ सांगणारी आजची म्हण घेऊन येत आहे----(विद्यार्थ्याचे नाव)
त्यानंतर एक वाक्प्रचार अर्थासह सांगावा व त्याचा वाक्यात उपयोग करुन दाखविण्याची संधी समोर उपस्थित विद्यार्थ्यांना द्यावी.

🔟बातमीपत्र-

जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते अशाच आजच्या बातम्या घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

1⃣1⃣ समूहगीत/देशभक्तीपर गीत-

आठवड्यातील ६ दिवस वेगवेगळी गीते घ्यावीत. त्यात एखादे स्फुर्तीगीतही असावे. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे.

1⃣2⃣बोधकथा

आजची बोधकथा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे. सुंदर व वाचनीय बोधकथा सांगाव्यात.

1⃣3⃣ प्रश्नमंजुषा

आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे.ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारले तर चांगले.)

1⃣4⃣ वैज्ञानिक दृष्टिकोन-

समाजात अनेक समज-गैरसमज असतात. त्यामूळे अंधश्रद्धा पसरतात, म्हणून घटनांचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करावे.
(शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.)

1⃣5⃣इंग्रजी शब्दार्थ

आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)

1⃣6⃣दिनांक तो पाढे-

आजचा पाढा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( प्रतिदिन २ ते ३१ पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)

1⃣7⃣ आजचे वाढदिवस

स्वतःचा जन्मदिवस स्वतःसाठी खास असतो. तर असे आजचा दिवस खास बनवणारे आहेत---
वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थी/शिक्षकांचे नाव घ्यावे व फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.

1⃣8⃣ पसायदान

बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन दोन्ही डोळे मिटवून व सरळ बसुन समूहाने पसायदान घ्यावे.

1⃣9⃣मौन

२ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.

2⃣0⃣ विसर्जन

विद्यार्थ्यांनी तीन टाळ्या वाजवाव्या व आपापल्या वर्गात रांगेत जावे.

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
     💎💎💎💎💎💎💎

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०१५

सातत्यपुर्ण सर्वंकष मुल्यमापन

cce वरील लेख आहे
काळजी पूर्वक वाचन करा
विषय - सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्घती उपयुक्तता
१) आकारीक मूल्यमापन म्हणजे काय?
आकारिक मूल्यमापन म्हणजे
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू असताना विद्यार्थ्याचे सातत्याने केले जाणारे मूल्यमापन.
विद्याथ्याचं व्यक्तीमत्व आकार घेत असतांना केललं मुल्यमापन म्हणजेच आकारिक मुल्यमापन
अध्ययनाचा प्रत्येक टप्पा गाठण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन होय.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौध्दिक सामाजिक विकासाची चाचणी.. म्हणजे मूल्यमापन
२) अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूल्यमापन साधनतंञाची उपयुक्तता किती व कशी?
आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation) –
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आकार घेत असतांना नियमित करण्याचे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन होय. या मूल्यमापनात पुढील साधनतंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर प्रत्येक विद्यार्थ्याच्या नोंदी ठेवणे अपेक्षित आहे.
दैनंदिन निरीक्षण
तोंडी काम (प्रश्नोत्तरे, प्रकटवाचन, भाषण संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा इत्यादी)
प्रात्यक्षिक / प्रयोग
उपक्रम / कृती (वैयक्तिक, गटांत, स्वयंअध्ययनाद्वारे)
प्रकल्प
चाचणी – (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारीक स्वरुपात घ्यावयाची छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह चाचणी (Open book test))
स्वाध्याय / वर्गकार्य
इतर – (प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साधने.)
वरील साधन तंत्रापैकी इयत्ता, विषय व उद्दिष्टे विचारात घेवून अधिकाधिक साधन तंत्राचा वापर करावा.
मूल्यमापन करतांना किमान पाच साधनतंत्राचा वापर करावा, तर कला व संगीत, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी दैनंदिन निरीक्षण, प्रात्यक्षिक व उपक्रम/कृती या तीन साधनतंत्राचा वापर करावा. तसेच विद्यार्थ्यांना वर्षभरात किमान एक प्रकल्प व प्रत्येक सत्रात किमान एक छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकांसह लेखी चाचणी (Open book test) घेणे अपेक्षित आहे.
विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व आकार घेत आसतांना विहीत केलेल्या सर्व क्षमतांचे निकष पुर्ण होत आहेत हे सतत पाहणे व त्यासाठी तंञांचा वापर करणे
सुप्तगुणांचा शोध घेता येतो.
अध्ययन-अध्यापनातील त्रुटी दूर करण्याची दिशा निश्चित करता येते.
आपले विचार व मत कसे व्यक्त करतो हे टिपता येते.
प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येते.
३) तोंडीकाम साधनतंञाची उपयुक्तता किती वाटते? त्याचा योग्य वापर कसा करावा?
वेदापासूनची आपली अभ्यासशैली
मुखोद्गत तंत्रावर अधिक भर देणारी
आपण तोंडी काम मध्ये पाठांतर घेऊ शकतो .. कविता गायन , भाषण, वाचन घेऊ शकतो
निडलेल्या सर्व तंत्राचे नियोजन तयार आसावे व विशेष करून तोंडी तंञाचा प्रथम करावा.. लेखनात कमजोर असणारे विद्यार्थीस तोंडी काम उपयुक्त आहे.. सभाधीटपणा तोंडीकामातून च दिसतो
अनेक घटक असतात..नेहमीच
आपण तोंडीकाम घेतो..पण आकारिक मूल्यमापन करताना
एकच घटक घेऊन त्यावरच तोंडी
काम घ्यावे व गुणदान करावे
योग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणी असेल तरच... तोंडीकाम यशस्वी
तोंडीकाम हे साधनतन्त्र निवडले असता याद्वारे विद्यार्थ्याच्या अभिव्यक्तिला संधी मिळते,सभाधीटपणा वाढतो.आत्मविश्वास वाढतो,मनातील भिती न्यूनगंड दूर होतो,शिक्षकाशी अधिक जवळचे नाते निर्माण होउन शाळेविषयी शिक्षकप्रती आकर्षण निर्माण होते.....
तोंडीकाम सत्राच्या आठवड्यातच करावे तशी टाचणात नोंद करावी
निकष नजरे समोर ठेवा.
व गुणदान करा
यासाठी आपल्याला तोंडीकामात आपण कृतियुक्त कविता गायन घेउ शकतो,प्रश्नोत्तरे,अध्ययन अध्यापनावेळी प्रसंगानुरूप संवाद घेता येइल,गटचर्चा,विविध कृति या व इतर बाबी नियोजनानुसार घेउ शकतो
CCE=
Continuous
comprehensive
Evaluation
हे नावाप्रमाणेच वेळोवेळी व्हावे
नाहीतर प्रामाणिक मूल्यमापनात
अडचणी येतील
मुलांचे उच्चारदोष दूर करायला हवेत
४ ) दैनंदिन निरीक्षण साधनतंञाची उपयुक्तता किती? वापर कसा केला जावा?
दैनं. निरी. म्हणजे
मुलांच्या वर्तनाची
total profile असते
निरी. नोंद निगेटीव्ह नसावी.. विशेष गुणनोंद करावी
दैनंदिन निरीक्षण मधुनच आपल्याला विद्यार्थ्याच्या वर्तनाची माहिती होते
विद्यार्थी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी दैनंदिन निरीक्षण महत्वाचे
वर्तनबदल होतो का ते समजले जाते
कल व आवड समजते
निरीक्षण मध्ये सर्जनात्मक बाबींची नोंद महत्वपूर्ण
शिकण्याची गती व पद्धतीचा मागोवा घेता येतो.
कच्च्या नोंदी ठेवून त्यातील चांगल्या नोंदी निवडाव्यात
Negative नोंद वेगळ्या कागदावर घ्यावी
Feedback करीता मदत होईल
बालकाची कमजोरी
शिक्षकांच्या लक्षात राहिल
नुसत्या नोंदी करायची नाही तर कमकुवत बाबीत मार्गदर्शन करायचे आहे
हेतुपुरस्सर उदिष्ट निश्चित करुन निरिक्षण व वस्तुनिष्ठ नोंदी हव्यात समस्या व उपायांचे चिंतन व पाल