गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

गणितीय सुत्रे

हि पोस्ट आपल्या मुलांसाठी आहे...त्यांच्या अभ्यासा साठी आहे...शक्य असल्यास सेव्ह करून ठेवा..

🎯वर्तुळ -

त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. 

वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात. 

वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो. 

जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.

व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय. 

वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो. 

वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो. 

वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D 

अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7 

अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36 

वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)

वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22   

वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30 

अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2 

अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36 

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर. 

दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते. 

वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ -

घनफळ -

इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)

काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची 

गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)

गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2     

घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3

घनचितीची बाजू = ∛घनफळ

घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते. 

घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2 

वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h 

वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2 

वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h 

इतर भौमितिक सूत्रे -

समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची 

समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार 

सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2

वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2

वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr

घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2

दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh 

अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2

अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3

त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )

शंकूचे घनफळ = 1/3 πr3h  

समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2

दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h) 

अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2 

(S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)  

वक्रपृष्ठ = πrl

शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी 

बहुभुजाकृती -

n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.

सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.

बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते. 

n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते. 

सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप 

बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2 

उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9

तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -

1 तास = 60 मिनिटे     

0.1 तास = 6 मिनिटे   

0.01 तास = 0.6 मिनिटे

1 तास = 3600 सेकंद     

0.01 तास = 36 सेकंद   

1 मिनिट = 60 सेकंद     

0.1 मिनिट = 6 सेकंद 

1 दिवस = 24 तास

              = 24 × 60

              =1440 मिनिटे  

              = 1440 × 60

              = 86400 सेकंद

घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -

घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते. 

दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो. 

दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.

तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात. 

 दशमान परिमाणे -

विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.

100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल 

10 क्विंटल = 1 टन  
   1 टन = 1000 कि.ग्रॅ. 

1000 घनसेंमी = 1 लिटर  

1 क्युसेक=1000घन लि.   

12 वस्तू = 1 डझन  
   12 डझन = 1 ग्रोस   
     24 कागद = 1 दस्ता 

20 दस्ते = 1 रीम   
 1 रीम = 480 कागद. 

विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध -

अ) अंतर –

1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.

1 से.मी. = 0.394 इंच 

1 फुट = 30.5 सेमी.  

1 मी = 3.25 फुट

1 यार्ड = 0.194 मी.
           1 मी = 1.09 यार्ड

ब) क्षेत्रफळ -    

1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2

1 सेमी 2 = 0.155 इंच 2

1 एकर = 0.405 हेक्टर

1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे

1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2

1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल 

1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल1 गॅलन = 4.55 लिटर 

क) शक्ती -    

1 एच.पी. = 0.746 किलो वॅट

1 किलो वॅट = 1.34 एच.पी. 

ड) घनफळ -    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2

1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3 

क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3

1 मी 3 = 35 फुट 3 

1 यार्ड 3 = 0.765 मी. 3 

इ) वजन -    

1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0

1 पौंड (lb) = 454 ग्रॅम

1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb) 

वय व संख्या -

दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2

लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2

वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो. 

दिनदर्शिका –

एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस 

महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात. 

टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात. 

नाणी -

एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज 

एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1 

पदावली -

पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)

💠💢💠💢💠💢

सोमवार, १८ जानेवारी, २०१६

परिपाठ

शालेय परिपाठासंबंधीत वॉट्सपवर आलेली सुंदर पोस्ट....

प्राथमिक शाळेतील इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी ५-६ विद्यार्थ्यांचे इयत्तेनुसार गट पाडावेत.त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे परिपाठातील विशिष्ट घटकांची जबाबदारी सोपवावी.

आठवड्यातील ६ वार वर्गवार विभागून द्यावेत.

उदा. सोमवार-८वी

मंगळवार-७वी असे...

आपणास परिपाठासाठी ३०मिनीटे वेळ असल्याने पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.

1⃣ सावधान- विश्राम आदेश

संचालन करणा-या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.

2⃣ राष्ट्रगीत

सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.शक्य झाल्यास साउंडद्वारे राष्ट्रगीत घ्यावे.

3⃣ प्रतिज्ञा

आठवड्यात ६ दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिस-या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी. किंवा सलग दोन दिवस एका भाषेतूनही सादर करता येईल.

(विद्यार्थ्यांचा स्तर पाहून बदल करता येईल.उदा-७वी-८वी-इंग्रजी, ५वी-६वी-हिंदी, ३री-४थी-मराठी)

4⃣ भारताचे संविधान

परिपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील. याही ठिकाणी शक्य असल्यास इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतून संविधान घेता येईल.

5⃣ प्रार्थना व श्लोक

ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे. प्रार्थना या विशिष्ट धर्माच्या असू नयेत, ज्यातून मानवता, दया, त्याग अशा गुणांची रुजवण होईल अशा असाव्यात.

6⃣ आजचा दिवस

केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतो, कोणता वार आणि कोणती तारीख आहे.

7⃣ सुविचार

सुविचार म्हणजे सुंदर असे विचार. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

8⃣ दिनविशेष

चला जाणून घेऊया, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले ते सांगत आहे-----.(विद्यार्थ्याचे नाव)

9⃣आजची म्हण व वाक्यप्रचार-

कमी शब्दांत जास्त अर्थ सांगणारी आजची म्हण घेऊन येत आहे----(विद्यार्थ्याचे नाव)
त्यानंतर एक वाक्प्रचार अर्थासह सांगावा व त्याचा वाक्यात उपयोग करुन दाखविण्याची संधी समोर उपस्थित विद्यार्थ्यांना द्यावी.

🔟बातमीपत्र-

जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते अशाच आजच्या बातम्या घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

1⃣1⃣ समूहगीत/देशभक्तीपर गीत-

आठवड्यातील ६ दिवस वेगवेगळी गीते घ्यावीत. त्यात एखादे स्फुर्तीगीतही असावे. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे.

1⃣2⃣बोधकथा

आजची बोधकथा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे. सुंदर व वाचनीय बोधकथा सांगाव्यात.

1⃣3⃣ प्रश्नमंजुषा

आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे--संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे.ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारले तर चांगले.)

1⃣4⃣ वैज्ञानिक दृष्टिकोन-

समाजात अनेक समज-गैरसमज असतात. त्यामूळे अंधश्रद्धा पसरतात, म्हणून घटनांचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करावे.
(शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.)

1⃣5⃣इंग्रजी शब्दार्थ

आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे-- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)

1⃣6⃣दिनांक तो पाढे-

आजचा पाढा घेऊन येत आहे--- संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( प्रतिदिन २ ते ३१ पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)

1⃣7⃣ आजचे वाढदिवस

स्वतःचा जन्मदिवस स्वतःसाठी खास असतो. तर असे आजचा दिवस खास बनवणारे आहेत---
वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थी/शिक्षकांचे नाव घ्यावे व फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.

1⃣8⃣ पसायदान

बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन दोन्ही डोळे मिटवून व सरळ बसुन समूहाने पसायदान घ्यावे.

1⃣9⃣मौन

२ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.

2⃣0⃣ विसर्जन

विद्यार्थ्यांनी तीन टाळ्या वाजवाव्या व आपापल्या वर्गात रांगेत जावे.

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
     💎💎💎💎💎💎💎